Join us

एकाच दिवशी डझनभर व्यक्तींना चावली कुत्री

By admin | Updated: April 2, 2015 22:53 IST

मुंब्य्रात एका चिमुरड्याला कुत्रा चावल्याची घटना ताजी असतानाच शहरातील विविध भागात (गुरुवारी ) एकाच दिवशी डझनभर व्यक्तींना कुत्री चावली आहे

ठाणे : मुंब्य्रात एका चिमुरड्याला कुत्रा चावल्याची घटना ताजी असतानाच शहरातील विविध भागात (गुरुवारी ) एकाच दिवशी डझनभर व्यक्तींना कुत्री चावली आहे. यामध्ये ४ मुलांचा समावेश असून त्यांच्यावर ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली.शहरात कुत्र्यांची संख्या वाढू लागल्याने त्यांची दहशतही वाढत आहे. त्यामुळे रस्त्यावरील नागरिकांना ते कळत न कळत लक्ष्य करीत आहेत. वेगवेगळ्या भागात गुरुवारी १२ जणांवर कुत्र्यांनी हल्ला केला. यामध्ये आशीष दिघोले (११), रवि चव्हाण (१० ), दर्शन महाले (९), उमर खान (१०) या चार लहान मुलांचाही समावेश आहे. याबाबत सिव्हील रुग्णालयात नोंद केली असून त्यांच्यावर उपचार सुरुअसल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. (प्रतिनिधी)