Join us

आझमी यांना दणका आणि दिलासाही

By admin | Updated: March 18, 2015 01:50 IST

भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी माझगाव दंडाधिकारी न्यायालयाने सपा नेते अबू आझमी यांना ठोठावलेली दोन वर्षांची शिक्षा सत्र न्यायालयाने मंगळवारी रद्द केली.

मुंबई: भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी माझगाव दंडाधिकारी न्यायालयाने सपा नेते अबू आझमी यांना ठोठावलेली दोन वर्षांची शिक्षा सत्र न्यायालयाने मंगळवारी रद्द केली. मात्र याचा नव्याने खटल्या चालवण्याचे निर्देशही सत्र न्यायालयाने दंडाधिकारी न्यायालयाला दिले आहेत. भायखाळा येथे सन २००० मध्ये आझमी यांनी भाषण केले होते. मात्र हे भाषण दोन समाजात तेढ निर्माण करणार होते, अशी तक्रार करण्यात आली. यासाठी दोषी धरत माझगाव दंडाधिकारी न्यायालयाने आझमी यांना अकरा हजार रूपये दंड व वरील शिक्षा ठोठावली. त्याला आझमी यांनी सत्र न्याायालयात आव्हान दिले होते. (प्रतिनिधी)