Join us  

मुंबईतील इमारती, विभागांची बाधा उतरली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2021 1:45 AM

९१ टक्के रुग्ण झाले कोरोनामुक्त; आता केवळ ७,७७१ सक्रिय

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाचा प्रसार आता मुंबईत पूर्णपणे नियंत्रणात येत असल्याचे चित्र आहे. आतापर्यंत ९३ टक्के रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर ७,७७१ रुग्ण सक्रिय आहेत. त्यामुळे गेल्या महिन्याभरात शेकडो बाधित क्षेत्रे आणि इमारतींना प्रतिबंधमुक्त करण्यात आले आहे. आतापर्यंत ५९ हजारांहून अधिक इमारती तर २,३७१ चाळी, झोपडपट्ट्या बाधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र ‘चेस द व्हायरस’, ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम प्रभावीपणे राबविल्यामुळे कोरोना नियंत्रणात आला आहे. सध्या पालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांपैकी डोंगरी येथे सर्वांत कमी म्हणजे दोन इमारती प्रतिबंधित असून ५९ रुग्ण सक्रिय आहेत. तर २२ विभागांमध्ये पाचशेहून कमी सक्रिय रुग्ण आहेत. रुग्णसंख्या कमी होत असल्याने यंत्रणेवरील ताण कमी होत आहे. 

बोरीवलीतील प्रसार नियंत्रणातसध्या आर मध्य (बोरीवली - ५७७)  आणि के पश्चिम (विलेपार्ले, अंधेरी, जोगेश्वरी ५२८) या दोन विभागांतच अधिक सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत आर मध्य विभागात सर्वाधिक २१ हजार २३० रुग्णांची नोंद झाली आहे. या विभागात प्रतिबंधित इमारतींची संख्याही सर्वाधिक होती. मात्र गेल्या दोन महिन्यांमध्ये पालिकेने बोरीवली भागात विशेष उपाययोजना केल्यानंतर प्रतिबंधित इमारतींच्या संख्येत आता लक्षणीय घट झाली आहे.

 नागपाड्याची प्रगतीएप्रिल महिन्यात मुंबईतील हॉटस्पॉट बनलेल्या नागपाडा विभागात कोरोनाचा प्रसार झपाट्याने वाढत होता. या प्रकरणी संबंधित विभागाच्या तत्कालीन सहायक आयुक्तांची तडकाफडकी बदली करण्यात आली होती. मात्र गेल्या काही महिन्यांत या विभागाने चांगली प्रगती केली असून, सध्या केवळ दोन इमारती प्रतिबंधित आहेत. 

n मुंबईत सध्या २,०९० इमारती प्रतिबंधित असून यामध्ये आठ लाख ८६ नागरिक राहतात. तर २२१ बाधित क्षेत्रांत १५ लाख २७ हजार रहिवासी राहतात.

टॅग्स :कोरोनाची लस