Join us
Daily Top 2Weekly Top 5

इमारत कोसळून दोन महिंला ठार

By admin | Updated: June 21, 2015 02:24 IST

वांद्रे पूर्वेकडील बेहरमपाड्यातील तीन मजली इमारतीचा काही भाग कोसळण्याची घटना शनिवारी रात्री घडली. या दुर्घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला

मुंबई : वांद्रे पूर्वेकडील बेहरमपाड्यातील तीन मजली इमारतीचा काही भाग कोसळण्याची घटना शनिवारी रात्री घडली. या दुर्घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला असून, तीन जण जखमी झाले आहेत. दुर्घटनेतील मृतांची ओळख पटलेली नाही. जखमींना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर महापालिका नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून, मदतकार्य तातडीने सुरु केले. मात्र पावसामुळे मदतकार्यात अडथळा येत होता. तर या दुर्घटनेत आणखी काही लोक जखमी झाल्याची भिती व्यक्त करण्यात येत असून, रात्री उशिरापर्यंत अग्निशमन दलाचे बचावकार्य सुरू होते.