Join us

बिल्डर परांजपे बंधू मुंबई पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:06 IST

विलेपार्ले पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखललोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : फसवणूक प्रकरणी प्रसिद्ध बिल्डर परांजपे बंधूंना मुंबई पोलिसांनी ताब्यात ...

विलेपार्ले पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : फसवणूक प्रकरणी प्रसिद्ध बिल्डर परांजपे बंधूंना मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा गुरुवारी दुपारी दाखल करण्यात आला असून, या प्रकरामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.

पुण्यातील राहत्या घरातून श्रीकांत पुरुषोत्तम परांजपे आणि त्यांचा मुलगा शशांक पुरुषोत्तम परांजपे या दोघांना ताब्यात घेण्यात आले. खोटी कागदपत्रे बनवून विश्वासघात आणि फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर वसुंधरा डोंगरे नामक एका महिलेने केला आहे. त्यांच्या तक्रारीनुसार हा गुन्हा दाखल केल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. विलेपार्ले पोलिसांनी परांजपे पितापुत्रांची चौकशी सुरू केली असून, त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.