Join us
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीच्या वादातून दिव्यात बिल्डरची हत्या

By admin | Updated: January 20, 2015 02:06 IST

दिव्यातील शिवसेनेचे शाखाप्रमुख तसेच बांधकाम व्यावसायिकाची सोमवारी सकाळी गोळ्या घालून हत्या केली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

मुंब्रा : दिव्यातील शिवसेनेचे शाखाप्रमुख तसेच बांधकाम व्यावसायिकाची सोमवारी सकाळी गोळ्या घालून हत्या केली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.दिवा येथील साबे गावात राहणारे संदीप पाटील (३२) हे सोमवारी सकाळी ९.४५ वाजण्याच्या सुमारास कामानिमित्त त्यांच्या आॅफिसकडे चालले होते. भगतवाडी परिसरातून जात असताना तीन हल्लेखोरांनी त्यांच्यावर गोळीबार केला तसेच धारदार तलवारीने वार केले. यात त्यांचा मृत्यू झाल्याचे मुंब्य्राचे पोलीस निरीक्षक एस. एम. मुंडे यांनी सांगितले. जमिनीच्या वादातून त्यांची हत्या करण्यात आली असून याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत कुणालाही अटक करण्यात आली नसल्याची माहिती मुंब्रा पोलिसांनी दिली. पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. (प्रतिनिधी)