Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिल्डरची जोगेश्वरीत हत्या

By admin | Updated: March 5, 2017 02:00 IST

नालासोपारा येथील नामांकित बिल्डर अली अजगर भानपूरवाला (३७) यांची त्यांच्या प्रेयसीच्या घरी प्रेयसीच्या पतीने चाकूने वार करून हत्या केली.

वसई : नालासोपारा येथील नामांकित बिल्डर अली अजगर भानपूरवाला (३७) यांची त्यांच्या प्रेयसीच्या घरी प्रेयसीच्या पतीने चाकूने वार करून हत्या केली. या वेळी झालेल्या हल्ल्यात प्रेयसीही जखमी झाली. ही घटना शनिवारी जोगेश्वरीच्या आयसीस पार्क इमारतीत घडली. अली भानपूरवाला यांचे जोगेश्वरी येथील बिस्मिल्ला शेखवर प्रेम होते. बिस्मिल्ला पतीबरोबर विभक्त झाली होती.त़्यामुळे दोघांनीही आठ दिवसांपूर्वीच गुपचूप लग्न केल्याचे मित्रांचे म्हणणे आहे. याचाच राग मनात धरून बिस्मिल्लाचा पहिला पती उमर शेखने शनिवारी बिस्मिल्लाचे घर गाठले. या वेळी अलीसुद्धा बिस्मिल्लाच्या घरी होता. तिने दरवाजा उघडताच उमरने चाकूने सपासप वार केले. तर बेसावध असलेल्या अलीवर तब्बल सोळा ते सतरा वार केले. हल्ला करून उमर पसार झाला आहे.(प्रतिनिधी)