Join us  

मुंबईत कॉन्स्टिट्यूशन भवन बांधा, आमदार डॉ.भारती लव्हेकर यांची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2018 9:12 PM

 राज्यव्यवस्थेसाठी लागणा-या प्रशासकीय तरतुदींचा सविस्तरपणे करण्यात आलेला अंतर्भाव यामुळे राज्यघटनेचे स्वरूप विस्तृत बनले आहे. अशी वैशिट्यपूर्ण राज्यघटना कशी बनली, सर्वसामान्यांना त्याची ओळख करून देण्याच्या दृष्टीने मुंबईमध्ये कॉन्स्टिट्यूशन भवन बांधावे, त्याला पर्यटनस्थळ करा” अशी मागणी

- मनोहर कुंभेजकर

मुंबई  -  भारतीय राज्यघटना हे भारत देशाचे संविधान असून या संविधानाचे शिल्पकार महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आहेत. १९५० साली अंमलात आलेलेभारतीय संविधान मुख्यत्वे १९३५ च्या भारत सरकारकायद्यावर आधारित असून आपली राज्यघटना जगातील सर्वात विस्तृत स्वरूपाची लिखित राज्यघटना ठरली आहे. कारण अनेक देशांच्या घटनांचा बदल करून घेतलेला भाग, तसेच स्वातंत्र्यपूर्व काळातील महत्वपूर्ण कायद्यांच्या तरतुदी, राज्यव्यवस्थेसाठी लागणा-या प्रशासकीय तरतुदींचा सविस्तरपणे करण्यात आलेला अंतर्भाव यामुळे राज्यघटनेचे स्वरूप विस्तृत बनले आहे. अशी वैशिट्यपूर्ण राज्यघटना कशी बनली, सर्वसामान्यांना त्याची ओळख करून देण्याच्या दृष्टीने मुंबईमध्ये कॉन्स्टिट्यूशन भवन बांधावे, त्याला पर्यटनस्थळ करा” अशी मागणी वर्सोव्याच्या भाजपा आमदार भारती लव्हेकर यांनी विधानसभा अधिवेशनात केली.त्यांची वर्सोवा,म्हाडा संकुलात आज भेट घेतली असता त्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी प्रचंड मेहनत घेऊन भारतीय संस्कृती व विचारधारा विचारात घेऊन रात्रंदिवस एक करून एक उत्तम, आदर्श ग्रंथ तयार केला. ते आजारी असतानादेखील २ वर्षे ११ महिने व १८दिवस सातत्याने समतोल अशा विचारांचे कल्याणकारी संविधान देशाला अर्पण केले. “ या घटनेच्या आधारे भारत देश कसा चालवला जातो याचे समग्र दर्शन घडते.  म्हणून संपूर्ण देशाला मार्गदर्शन करणारी, नियंत्रितकरणारी, संपूर्ण देशाचा विकास घडवून आणणारी, देशातील माणसांना माणुसकीचे, मान सन्मानाचे आणि नैतिकतेचे दर्शन घडवणारी राज्यघटना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीकशी तयार केली.  यावर एक डॉक्युमेंटरी फिल्म बनवावी. तसेच राज्यघटनेची विस्तृत माहिती असलेली पुस्तिका कॉन्स्टिट्यूशन भवनमध्ये उपलब्ध करून द्यावी. या पुस्तिकेचा शालेय विद्यार्थी, सर्वसामान्यांना ओळख व्हावी या उद्देशाने देशामध्ये सर्वतोपरी प्रसार आणि प्रचार करावा यासाठी  कॉन्स्टिट्यूशन भवन बांधून त्याचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करावा” अशी मागणी आमदार डॉ.लव्हेकर यांनी केली आहे.

टॅग्स :भारती लव्हेकरमुंबई