Join us
Daily Top 2Weekly Top 5

अर्थसंकल्प सर्वसमावेशक असेल- मुनगंटीवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 02:43 IST

शेतक-यांच्या प्रश्नांसंदर्भात सरकार गंभीर आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात राज्याच्या सर्वांगीण प्रगतीचा विचार केला जाईल. कोणत्याही समाजघटकावर अन्याय होणार नाही याची दक्षता अर्थसंकल्पात घेतली आहे

पुणे : शेतक-यांच्या प्रश्नांसंदर्भात सरकार गंभीर आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात राज्याच्या सर्वांगीण प्रगतीचा विचार केला जाईल. कोणत्याही समाजघटकावर अन्याय होणार नाही याची दक्षता अर्थसंकल्पात घेतली आहे, असे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी येथे स्पष्ट केले.ते म्हणाले, राज्यात इतकी वर्षे ‘जाणता राजा’च्या पक्षाचे सरकार होते. त्या काळात शेतकरी आत्महत्या सर्वाधिक झाल्या. आमच्या सरकारने कृषी विभागाची तरतूद वाढवली आहे. शेतकºयांच्या अपेक्षांची पूर्तता होत नसल्यामुळे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गाडीवर दगडफेक झाली, याकडे लक्ष वेधले असता मुनगंटीवार यांनी, शेतकरी संघटनेने जे हल्ले केले ते काँग्रेसच्या काळातही होत होते, असे सांगितले.बडोदा येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणातील लक्ष्मीकांत देशमुख यांच्या ‘राजा तू चुकतो आहेस, सुधारलं पाहिजेस’, या विधानाविषयी विचारले असता मुनगंटीवार म्हणाले, ‘राजा’ हा शब्द प्रतिकात्मक आहे. त्यांचे हे विधान म्हणजे सरकार किंवा कोणत्या पक्षावर टीका नाही. राज्यकर्त्याने दलित, आदिवासी, शोषित आणि पीडित वर्गाकडे लक्ष देताना त्यांच्या अपेक्षांची पूर्ती करावी, अशी देशमुख यांची अपेक्षा आहे आणि त्यात काही गैर नाही.‘त्यांनी’ फक्त मुलाखतच घ्यावी!महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतलेल्या मुलाखतीमध्ये स्वतंत्र विदर्भाच्या प्रश्नावर माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी दिलेल्या उत्तरावर मुनगंटीवार यांनी, त्यांनी पुढची ५० वर्षे एकमेकांची मुलाखत घेत राहावे आणि आम्हाला राज्य करू द्यावे, अशी मिश्कील टिपण्णी केली.

टॅग्स :सुधीर मुनगंटीवार