नवी दिल्ली : सार्वजनिक क्षेत्रतील दूरसंचार कंपनी बीएसएनएलने 9 राज्यांतील नक्षल प्रभावित क्षेत्रंत मोबाईल टॉवर नेटवर्क निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी कंपनीला 3,241 कोटी रुपयांची गरज आहे. खर्चाचे अंतिम अंदाजपत्रक कंपनीने सरकारला सादर केले आहे. हा प्रकल्प याच महिन्यात पूर्ण होणार होता. मात्र, आधीच्या सरकारच्या कालावधीत खर्चाच्या अंदाजावरून वाद निर्माण झाल्यामुळे तो रखडला होता. सरकारकडून अनुदान मंजूर झाल्यास प्रकल्प पूर्ण होण्यास 12 महिने लागतील, असे कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.
बीएसएनएलला हवेत 3,241 कोटी रुपये
By admin | Updated: June 5, 2014 00:42 IST