बदलापूर : अल्पवयीन मुलीची छेड काढली म्हणून तरुणास विवस्त्र करून बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या मारहाणीची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली. या प्रकरणी पोलिसांनी मुलाच्या फिर्यादीवरून मारहाण करणाऱ्या ४ जणांविरोधात आधीच गुन्हा दाखल केला होता. मात्र, आता व्हिडीओ क्लिपमध्ये दिसणाऱ्या इतरांवरही कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. ३ आॅक्टोबरला बदलापूरमध्ये एका अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यात उदय राणे या २२ वर्षीय तरुणाविरोधात पोक्साअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. त्या प्रकरणानंतर तो पळून गेला होता. पोलिसांआधीच मुलीच्या नातेवाइकांच्या ताब्यात तो ८ आॅक्टोबरला सापडला. त्यानंतर, त्यास त्यांनी निर्वस्त्र करून बेदम मारहाण केली. या वेळी पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी त्याला सोडवून हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मारहाण करणाऱ्या चौघांविरोधात बदलापूर पोलिसांनी मारहाणीचा गुन्हा दाखल केला. हा प्रकार ७ आॅक्टोबरला घडला होता. आता १५ दिवसांनंतर या घटनेची व्हिडीओ क्लिप बाहेर आली आहे. त्याची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून, क्लिपमधील इतरांवरही कारवाई केली जाणार आहे.
तरु णास विवस्त्र करून बेदम मारहाण
By admin | Updated: October 25, 2015 01:05 IST