Join us
Daily Top 2Weekly Top 5

भावाच्या हत्येचा घेतला सूड

By admin | Updated: October 14, 2016 07:03 IST

मोठ्या भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्याच्या मारेकऱ्याच्या मोठ्या भावावर हल्ला करण्यात आला. बोरीवली पोलिसांनी या प्रकरणी

मुंबई : मोठ्या भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी त्याच्या मारेकऱ्याच्या मोठ्या भावावर हल्ला करण्यात आला. बोरीवली पोलिसांनी या प्रकरणी बुधवारी पाच जणांना अटक केली. सुनील घाग (३१), करण उत्तेकर (२१), निखिल व्यासुला (२०), दीपक गरड (२०) आणि एक अनोळखी व्यक्तीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत. बोरीवली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६ आॅक्टोबर रोजी चिकूवाडीच्या साईबाबानगरमध्ये मनिष पांचाळ (२८) या इस्टेट एजंटवर काही अनोळखी व्यक्तींनी चाकू, दगडाने हल्ला करून त्याला अर्धमेला करून पळ काढला होता. याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी पांचाळला शताब्दी रुग्णालयात दाखल केले. ज्यानंतर त्याला जे.जे. रुग्णालयात हलविण्यात आले. त्याच्यावर हा हल्ला का झाला याची काहीच माहिती पोलिसांकडे नव्हती. पांचाळच्या चौकशीत त्याचा मोठा भाऊ कैलाश याने सुनीलचा मोठा भाऊ संदीपची संपत्तीच्या वादातून दोन वर्षांपूर्वी हत्या केली होती. चौकशीसाठी घागला पोलिसांनी ताब्यात घेतले. तेव्हा त्यानेच भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी मनिषवर हल्ला केल्याचे तपासात उघड झाले. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली. (प्रतिनिधी)