Join us

भाऊबीजेला रखडपट्टी

By admin | Updated: October 26, 2014 00:54 IST

खोळंब्याशिवाय मध्य रेल्वेचा प्रवास कसला, ही ख्याती रेल्वेने दिवाळीतही टिकवून ठेवली.

मुंबई :  खोळंब्याशिवाय मध्य रेल्वेचा प्रवास कसला, ही ख्याती रेल्वेने दिवाळीतही टिकवून ठेवली. गेले आठवडाभर रुळावर असलेल्या उपनगरीय लोकल सेवेला भाऊबीजेच्या दिवशी आसनगाव - आटगाव स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड झाल्याने डाऊन तसेच आसनगाव स्थानकादरम्यान अप मार्गाला खो बसला. शनिवारी पावणोबाराच्या सुमारास झालेल्या या घटनेत तब्बल तास-दिड तास लोकलसह लांबपल्याच्या गाडय़ांची वाहतूक विस्कळीत झाली होती.
या घोळासंदर्भात उपनगरीय रेल्वे प्रवासी एकता संस्थेचे उपाध्यक्ष राजेश घनघाव यांनी विभागीय व्यवस्थापक मुकेश निगम यांना प्रवाशांना झालेल्या त्रसाबाबत खडसावले असता तांत्रिक बिघाड रेल्वे प्रशासनाच्या हातात नसल्याचे स्पष्टीकरण त्यांना देण्यात आले. त्यावर घनघाव यांनी प्रवाशांना होत असलेल्या त्रसाची जंत्रीचा पाढा वाचल्यावर मात्र रेल्वे अधिका-यांची भंबेरी उडाली. जी घटना घडली त्याबाबतची उद्घोषणा करण्यात येत नसल्याचेही त्यांनी निदर्शनास आणले. त्यावर मात्र संबंधितांनी तातडीने दखल घेत ती सुधारणा केल्याचे सांगण्यात आले. जादाच्या गाडय़ा सोडण्यासह आहेत त्या गाडय़ा रद्द न कराव्यात अशीही मागणी  घनघाव यांनी केली, मात्र गाडय़ा उभ्या करण्यासाठी पुरेशी जागा नसल्याचे कारण सांगण्यात आले. (प्रतिनिधी) 
 
च्आसनगाव — आटगाव स्थानकादरम्यान  मालगाडीच्या इंजिनात  बिघाड झाल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली.
च्या घटनेमुळे बहुंतांशी गाडय़ा टिटवाळा स्थानकापुढे रद्द करण्यात आल्या. विस्कळीत झालेले वेळापत्रक सायंकाळी उशिरार्पयत विलंबानेच धावत होते.