मुंबई : सुपरस्टार सलमान खानच्या ५०वा वाढदिवस त्याचे कुटुंबीय आणि मित्रपरिवारासोबत त्याच्या चाहत्यांनीसुद्धा आपापल्या पद्धतीने जोरदार साजरा केला.वांद्रे येथील गॅलक्सी अपार्टमेंटमधील सलमानच्या निवासस्थानाबाहेर चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. आपल्या लाडक्या अभिनेत्याची एक झलक पाहण्यासाठी आणि शुभेच्छा देण्यासाठी दिवसभर सारेजण प्रतीक्षा करीत होते. सलमानच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या पनवेलच्या फार्म हाउसवर मोठी पार्टी ठेवण्यात आली होती. याप्रसंगी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा, सोनम कपूर, तब्बू, टेनिसपट्टू सानिया मिर्झा, डेव्हीड धवन, फराह खान, हर्षाली मल्होत्रा, रितेश देशमुख, अमिशा पटेल, झरीन, डेझी अशा अनेक सेलीब्रिटींनी आवर्जून हजेरी लावली. सलमानने रात्री १२ वाजता केक कापला. हा जल्लोष पहाटेपर्यंत सुरूहोता. सलमान खानने आपल्या वाढदिवसाचे रिटर्न गिफ्टही चाहत्यांना दिले. टिष्ट्वटरच्या माध्यमातून एका संकेतस्थळाची निर्मिती केली असून, याद्वारे अधिकाधिक व्यक्तींना जोडण्याची संकल्पना असल्याचे त्याने स्पष्ट केले आहे. (अधिक वृत्त/ हॅलो ४)
भाईजान @ ५०
By admin | Updated: December 28, 2015 03:11 IST