Join us  

हुतात्मा चौकात गाड्या आणा बिनधास्त! महापालिका उभारणार बहुमजली वाहनतळ, पार्किंग समस्या लवकरच सुटणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 03, 2024 1:09 PM

कंत्राटदाराची नियुक्ती करून एक वर्ष झाले तरी माटुंगा आणि मुंबादेवी येथील वाहनतळ इमारत उभारण्यास अद्याप तरी सुरुवात झालेली नाही. 

मुंबई : पार्किंगचा प्रश्न निकालात काढण्यासाठी अनेक ठिकाणी बहुमजली वाहनतळ उभारण्याची योजना महापालिका राबवत आहे. माटुंगा, मुंबादेवी आणि वरळीपाठोपाठ आता हुतात्मा चौकात बहुमजली वाहनतळ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या ठिकाणच्या वाहनतळामध्ये १७६ वाहने उभी करण्याची क्षमता असणार आहे. कंत्राटदाराची नियुक्ती करून एक वर्ष झाले तरी माटुंगा आणि मुंबादेवी येथील वाहनतळ इमारत उभारण्यास अद्याप तरी सुरुवात झालेली नाही. 

मुंबईच्या शहर भागात दिवसभर हजारो वाहने येत असतात. या वाहनांसाठी पालिकेने ठिकठिकाणी वाहनतळ उभारले आहेत. मात्र वाहनांची संख्या प्रचंड असल्याने हे वाहनतळ कमी पडत आहेत. वाहनतळासाठी जागेचाही प्रश्न आहे. त्यामुळे बहुमजली वाहनतळ उभारण्याचा पर्याय स्वीकारण्यात आला आहे. २०१४ सालापासून वाहनांची घनता १६ टक्क्यांनी वाढली आहे. या वर्षात केलेल्या सर्वेक्षणात शहरातील नोंदणीकृत वाहनांची संख्या २५.४६ लाख एवढी होती. २०२० साली ही वाहनांची संख्या थेट ३० लाखांवर पोहोचली आहे. वाहन खरेदीसाठी सवलतीच्या दरात कर्ज मिळू लागल्याने  अलीकडच्या काळात वाहन घेणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. मुंबईत केवळ ४५ हजार वाहने पार्किंग करण्याची जागा आहे. त्यामुळे बहुमजली वाहनतळ उभारण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. 

सर्वेक्षणात शहरातील नोंदणीकृत वाहनांची संख्या २५.४६ लाख एवढी होती४५,००० वाहने पार्किंग करण्याची जागा मुंबईत  आहे. १६ % टक्क्यांनी वाढ२०१४ सालापासून वाहनांची घनता  वाढली आहे. 

जास्त बोली लावून मिळविले कंत्राटहुतात्मा चौक येथील काम जास्त बोली लावून कंत्राटदाराने मिळवले आहे. या कामासाठी पालिकेने निश्चित केलेल्या दरापेक्षा ५२ टक्के अधिक दराने बोली लावून जी.एस.टी. वगळता सुमारे ६२ कोटी रुपयांमध्ये होणारे काम ९५ कोटी रुपयांमध्ये मिळविले आहे.

या कामांना कधी         मिळणार मुहूर्त? -   मुंबादेवी येथे वाहनतळ उभारण्यासाठी एसएमएस इन्फ्रास्ट्रक्चर या कंपन्या पात्र ठरल्या आहेत. या कंपन्यांनी अनुक्रमे उणे २.५० टक्के व ३.३५ टक्के दराने बोली लावून कंत्राट मिळवले.  -  वाहनतळांसाठी अनुक्रमे १२३ आणि १२२ कोटी रुपये खर्च करण्यास मंजुरी दिली आहे. माटुंगा येथे ४७५ तर मुंबादेवी येथे ५४६ वाहने पार्क केली जाऊ शकतात. वरळीत २१६ कोटी रुपये खर्चून वाहनतळ उभारण्याचे काम होणार आहे. या कामाला मुहूर्त कधी मिळेल, अशी चर्चा सुरू आहे. 

टॅग्स :पार्किंगमुंबई