Join us

तेजस्वीच्या मेहनतीचे चीज

By admin | Updated: March 7, 2015 22:27 IST

क्रीडा क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या तेजस्वीला यंदाचा प्रतिष्ठेचा समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय युवा पुरस्काराने गौरविण्यात आले.

जयंत धुळप - अलिबागक्रीडा क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या तेजस्वीला यंदाचा प्रतिष्ठेचा समजल्या जाणाऱ्या राष्ट्रीय युवा पुरस्काराने गौरविण्यात आले. तिच्या जिद्द आणि मेहनतीवर केंद्र सरकारनेही शिक्कामोर्तब केल्याने तिच्या कर्तृत्वाला आणखीनच बळ मिळाले. शालेय जीवनात अभ्यासाबरोबरच कराटेकडे तेजस्वीने लक्ष केंद्रित केले आणि जिल्हास्तरीय नव्हे तर राज्यस्तरीय, राष्ट्रीयस्तरीय स्पर्धेत असंख्य पदके संपादित केली. २००३ मध्ये सिंगापूर येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय वर्ल्ड शितोरीयो कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताचे नेतृत्व केले आणि तिला नवा आत्मविश्वासच गवसला.२००८ मध्ये नेहरू युवा केंद्राची ‘राष्ट्रीय सेवाकर्मी’ अलिबाग तालुका प्रतिनिधी म्हणून तेजस्वीची निवड झाली. नेहरू युवा केंद्राच्या माध्यमातून तिला सामाजिक कार्याचा सूर गवसला.शासनाच्या महिलांसाठी असणाऱ्या स्वयंसिद्ध प्रशिक्षण शिबिरांतर्गत तेजस्वीने रायगड जिल्ह्यात १५० प्रशिक्षकांमार्फत आतापर्यंत ८,५०० मुलींना कराटे, लाठीकाठी, एरोबिक्स, योगाचे प्रशिक्षण दिले. याशिवाय जिल्हा विधीसेवा प्राधिकरण व प्रिझम संस्थेच्या माध्यमातून कायदेविषयक शिक्षण देण्यासाठी ८५० हून अधिक ठिकाणी पथनाट्यांचे आयोजन करून जिल्ह्यात जनजागृती केली आहे. च् तेजस्वीला महाराष्ट्र गुणगौरव पुरस्कार, सर्वोत्कृष्ट रायगड जिल्हा स्वयंसिद्धा प्रशिक्षिका पुरस्कार, जागर समतेचा गुणगौरव पुरस्कार, सर्वोत्कृष्ट युवती पुरस्कार (नेहरू युवा केंद्र भारत सरकार), कौतुक पुरस्कार, इंदिरा गांधी समाज गौरव पुरस्कार, रायगड भूषण पुरस्कार, तेजस्विनी पुरस्कार, लायन्स गौरव पुरस्कार आदी पुरस्कार प्राप्त झाले आहेत.