Join us
Daily Top 2Weekly Top 5

उज्ज्वल भविष्यासाठी ‘सेवादल जोडो’ अभियान

By admin | Updated: May 9, 2017 01:45 IST

राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल यांच्या संयुक्त विद्यमाने, सेवादलाचे आद्य संस्थापक डॉ. नारायण

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राष्ट्रीय मिल मजदूर संघ आणि मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल यांच्या संयुक्त विद्यमाने, सेवादलाचे आद्य संस्थापक डॉ. नारायण सुब्बाराव हर्डिकर यांचा जयंती दिन परळच्या मामासाहेब फाळके सभागृहात पार पडला. या वेळी पार पडलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात संघटनेसह देशाचा भविष्यकाळ उज्ज्वल करण्यासाठी ‘सेवादल जोडो’ अभियान राबवण्याचा निर्धार करण्यात आला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे ज्येष्ठ उपाध्यक्ष अण्णा शिर्सेकर होते. हर्डिकर यांचे थोर विचार, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यामुळे मिळालेले बळ आणि मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस सेवादल सचिन अहिर यांच्या नेतृत्वामुळे सत्तेत नसतानाही दलाचा भविष्यकाळ उज्ज्वल असेल, असा विश्वास सेवादलाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.