Join us

लाचखोर पोलीस नाईकास अटक

By admin | Updated: October 1, 2014 00:05 IST

लाचखोर पोलीस नाईकास अटक

लाचखोर पोलीस नाईकास अटक
मुंबई: ट्रॅव्हल एजन्सीच्या मालकाकडून २५ हजारांची लाच मागणार्‍या पोलीस नाईकास लाच लुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकार्‍यांनी अटक केली. लहू पोखरकर असे या लाचखोर पोलीसाचे नाव असून तो सहार पोलीस ठाण्यात कार्यरत आहे.
विलेपार्ले परिसरात इतर राज्यात जाणार्‍या अनेक ट्रॅव्हल्स एजन्सीच्या बस गाड्या रस्त्यालगत उभ्या असतात. वाहतूक पोलिसांकडून यावर नेहमीच कारवाई केली जाते. मात्र सहार पोलीस ठाण्यात चालक या पदावर कायर्रत असलेेल्या पोखरकरने या वाहनांवर कारवाई न करण्यासाठी २५ हजारांची लाच मागितली होती. एजन्सीच्या मालकाने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार दाखल केली. त्यानुसार अधिकार्‍यांनी आज सकाळी सहार पोलीस ठाण्याच्या परिसरात सापळा रचून पोखरकर याला २५ हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. (प्रतिनिधी)