Join us

वनविभागाचा लाचखोर अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

By मनीषा म्हात्रे | Updated: March 28, 2023 19:55 IST

महेंद्र गिते असे अधिकाऱ्याचे नाव असून ते गोराई बोरिवलीच्या कांदळवन संधारण घटक (पश्चिम मुंबई) येथे कार्यरत आहे.

मुंबई :

व्यावसायिक गाळ्यावर निष्कासनाची कारवाई करू नये यासाठी पाच लाखांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी वनविभागाच्या राउंड ऑफिसर विरोधात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) गुन्हा नोंदवला आहे.  महेंद्र गिते असे अधिकाऱ्याचे नाव असून ते गोराई बोरिवलीच्या कांदळवन संधारण घटक (पश्चिम मुंबई) येथे कार्यरत आहे.एसीबीने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तसेच साक्षीदार यांच्या  व्यावसायिक गाळ्यांवर वनविभागामार्फत निष्कासन कारवाई न करण्यासाठी   गिते याने ५ लाखांची मागणी केली. तक्रारदार यांनी एसीबीकडे धाव घेत ७ डिसेम्बर रोजी तक्रार दिली. त्यानुसार, एसीबीने केलेल्या पडताळणीत पैसे मागितल्याची स्पष्ट होताच, मंगळवारी गीते विरोधात भ्रष्टाचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी एसीबीकडून अधिक तपास सुरु आहे.