- चेतन ननावरे, मुंबईशहरात मतदार नोंदणीला मिळणारा युवावर्गाचा प्रतिसाद पाहता २०१७मध्ये होणाऱ्या मुंबई मनपाच्या निवडणुकीत सर्वच पक्ष तरुण मतदारांना खूश करण्याचा प्रयत्न करणार, अशी चिन्हे दिसत आहेत. नुकत्याच झालेल्या नवमतदार नोंदणीत सुमारे ३५ टक्के अर्ज हे १८ ते २० वयोगटातील तरुणांनी केल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने ‘लोकमत’ला दिली आहे.सध्या तरी नवमतदार नोंदणीमध्ये आलेल्या अर्जांची छाननी सुरू आहे. हरकती आणि आक्षेप घेण्याची अंतिम मुदतही संपलेली आहे. त्यामुळे १६ जानेवारीला अंतिम मतदार यादी प्रकाशित झाल्यानंतर आकडा हाती येईल. मात्र सद्य:स्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ३४,३९४ अर्ज दाखल झाले आहेत. अर्ज करणाऱ्यांपैकी २५ वर्षांखालील व्यक्तींची संख्या ५० टक्क्यांहून अधिक आहे. जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी शहरातील धारावी, शीव-कोळीवाडा, वडाळा, माहीम, वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी, कुलाबा या विधानसभा मतदारसंघांतून नव्या मतदारांना अर्ज करण्याचे आवाहन केले होते. त्यासाठी विविध केंद्रांवर मतदार नोंदणीचे विशेष अभियान राबवण्यात आले. तृतीयपंथींनीही केली मतदार नोंदणीस्त्री आणि पुरुष मतदारांसह तृतीयपंथींनीही या अभियानात सामील होत नोंदणी अर्ज केले आहेत. वरळी विधानसभेतून ५, भायखळा आणि मलबार हिलमधून प्रत्येकी २ असे एकूण ९ अर्ज आल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने सांगितले. सातत्याने होणाऱ्या जनजागृतीमुळे तृतीयपंथी म्हणून मतदार नोंदणी करणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले.नव्या अर्जांसोबत नावे वगळण्याची प्रक्रियाही राबवण्यात आली. शिवाय मतदार नोंदणीत किरकोळ दुरुस्तीसह मतदारसंघांतर्गत स्थलांतरित झालेल्या मतदारांनाही पत्ता बदलण्याची व्यवस्था करण्यात आली होती. १६ जानेवारीला नव्या मतदारांची अंतिम यादी प्रकाशित केली जाईल.3783मतदारांची नावे वगळणारअभियानात ३,७८३ मतदारांनी नावे वगळण्यास अर्ज केले आहेत. लोकसभा निवडणुकीवेळी सुओमोटो प्रक्रियेअंतर्गत निवडणूक आयोगाने मतदारांची नावे वगळली होती. त्यानंतर विधानसभा निवडणुकांमध्ये मतदारांची नावे वगळल्याचा आरोप करत राजकीय पक्षांनी गोंधळ घातला होता. त्यामुळे नवी यादी प्रकाशित होताना मतदारांनी त्यांची नावे आहेत की नाहीत, हे तपासून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे.वयानुसार आलेल्या मतदार अर्जांची संख्यावयोगटमतदार अर्ज१८ ते २०१२,९०१२१ ते २५६,३५७२५ वर्षांवरील १५,१२७इतर९एकूण३४,३९४नावे वगळण्यासाठी आलेले अर्ज 3,783नाव, वय, लिंग या पर्यायांत बदलासाठी केलेले अर्ज 9,881मतदारसंघांतर्गत स्थलांतरित झालेल्या मतदारांचे अर्ज 1,262विधानसभा मतदारसंघनिहाय आलेल्या अर्जांची संख्यामतदारसंघएकूण अर्जधारावी३,९८५शीव ७,१५८वडाळा२,६९४माहीम२,३६३वरळी२,४७०शिवडी२,१०९भायखळा४,२३०मलबार हिल२,३६१मुंबादेवी४,२४५कुलाबा२,७७९एकूण३४,३९४
तरुणांची मते ठरणार निर्णायक
By admin | Updated: December 19, 2015 02:55 IST