नवी मुंबई : निवडणुका शांतता व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी पोलिसांनी जय्यत तयारी सुरू केली आहे. प्रतिबंधात्मक कारवाई आणि खबरदारी म्हणून परवाना असलेली शस्त्रही जमा करण्यास सुरुवात केली आहे. आतार्पयत तब्बल 791 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून 648 जणांना समन्स व वॉरंट बजावण्यात आले आहे.
लोकसभा निवडणूक नवी मुंबईमध्ये पूर्णपणो शांततेमध्ये पार पडली होती. कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नव्हता. विधानसभा निवडणूकही शांततेमध्ये व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. ऐरोली व बेलापूर मतदार संघामध्ये प्रत्येकी 15 उमेदवार रिंगणात आहेत. सर्वच पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्यामुळे पोलिसांचीही कसोटी लागणार आहे. आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. शहरात 767 जणांकडे शस्त्रपरवाना आहे. यामधील 194 जणांची शस्त्रे जमा करणो आवश्यक असून आतार्पयत 16क् जणांची शस्त्रे जमा करून घेण्यात आली आहेत. आचारसंहिता सुरू झाल्यापासून विनापरवाना वापर केलेले पाच पिस्टल व गावठी कट्टे जप्त केले असून आरोपींना अटक केली आहे.
शहरात ज्यांच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत व निवडणुकीमध्ये शांतता भंग करण्याची शक्यता आहे अशांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे. 6 जणांना तडीपार केले आहे. 791 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. यामध्ये 8 जणांवर एमपीडीए लावण्यात आला आहे. पोलिसांनी फरार आरोपींची नावेही प्रसिद्ध केली आहेत. दारूबंदी, जुगार, आचारसंहिता भंगाची कारवाईही वेगाने सुरू केली आहे. निवडणूक काळात कोणताही गैरप्रकार होवू नये यासाठी दक्षता घेतली जात असल्याची माहिती परिमंडळ एकचे उपआयुक्त शहाजी उमाप यांनी दिली आहे. (प्रतिनिधी)
सर्वत्र कडक बंदोबस्त
पोलिसांनी शहरात सर्वत्र कडक बंदोबस्त ठेवण्यास सुरुवात केली आहे. नाकाबंदी वाढविण्यात आली आहे. शहराच्या सर्व प्रवेशद्वारांवरही लक्ष ठेवण्यात येणार आहे. निवडणुकीच्या वेळी एसआरपीची तुकडी व इतर सर्व प्रकारचा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.
काळ्या पैशांवर लक्ष
निवडणूक काळात काळ्या पैशांवरही पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे. शहरात ठिकठिकाणी तपासणी सुरू केली आहे. मतदारांना आमिष दाखविण्याचा प्रयत्न होवू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे. आचारसंहिता सुरू झाल्यापासून सानपाडामध्ये यापूर्वी 21 लाख रुपये रोकड जप्त केली होती. शहरात सर्वत्र याविषयी दक्षता बाळगली जात आहे.
जमा केलेली परवानाधारक शस्त्रे
रबाळे12
रबाळे एमआयडीसी 7
कोपरखैरणो11
वाशी 58
एपीएमसी 24
तुर्भे1क्
तुर्भे एमआयडीसी 5
नेरूळ17
सीबीडी8
एनआरआय8