Join us
Daily Top 2Weekly Top 5

हुंड्यासाठी लग्न मोडले; सात जणांविरुद्ध गुन्हा

By admin | Updated: May 6, 2015 01:40 IST

विवाहापूर्वीच विविध मार्गानी लाखो रु पये घेतल्या नंतर देखील हुंड्यासाठी लग्न मोडणाऱ्या नवऱ्याचे ऐकून ७ जणांवर मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुंब्रा: विवाहापूर्वीच विविध मार्गानी लाखो रु पये घेतल्या नंतर देखील हुंड्यासाठी लग्न मोडणाऱ्या नवऱ्याचे ऐकून ७ जणांवर मुंब्रा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मुंबईतील उपनगरा मधील मिरा रोड येथे रहाणाऱ्या मनशा उर रेहमान खान (२९) याचा विवाह (निकाह) २ मे रोजी मुंब्रा येथे रहाणाऱ्या तरूणीशी होणार होता. येथील कौसा भागातील एका सभागृहात विवाहाची विधिवत पूर्ण तयारी झाली असतांना हॉलवर पोहचलेला नवरा तसेच त्याच्या नातेवाईकांनी ऐनवेळी कार किंवा रोख १० लाख रु पयांची मागणी वधू पक्षाकडे केली. ही मागणी पूर्ण करण्याबाबतची बोलणी सभागृहा बाहेरील रस्त्यावर सुरु असतानाच, नवरा तसेच त्याच्या आई व बहिणीने हॉल बाहेर स्वागत करण्यास वधू पक्षाकडील कोणीही उपस्थित नव्हते, असे क्षुल्लक कारण सांगून लग्न मोडले. या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. (वार्ताहर)