Join us  

युती तोडा : शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा वाढता दबाव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2019 6:55 AM

उद्याच्या लोकसभा निवडणुकीपुरता विचार न करता दूरगामी विचार करून भाजपासोबतची युती तोडा, असे साकडे जिल्हाजिल्ह्यांतून आलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोमवारी घातले.

मुंबई : उद्याच्या लोकसभा निवडणुकीपुरता विचार न करता दूरगामी विचार करून भाजपासोबतची युती तोडा, असे साकडे जिल्हाजिल्ह्यांतून आलेल्या शिवसेनेच्या पदाधिकाºयांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोमवारी घातले. मात्र ठाकरे यांनी त्याबाबत कुठलाही निर्णय दिला नाही. सगळ्यांशी चर्चा करून आपण निर्णय घेऊ, असे त्यांनी सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.संसदेचे अधिवेशन सुरू असताना ठाकरे यांनी, पक्षाच्या सर्व खासदारांची तातडीची बैठक मंगळवारी मातोश्रीवर बोलावली आहे, तर राज्यातील शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक बुधवारी मातोश्रीवर होणार आहे. त्यामुळे युतीबाबतचा निर्णय या बैठकांनंतर घेण्यात येईल, असे सांगण्यात येते.ज्यांना लोकसभेची निवडणूक लढायची आहे, अशा बहुतेक सगळ्यांनी भाजपासोबत युती करावी, अशी भूमिका घेतली आहे. त्यांनी आपली भावना उद्धव ठाकरे यांच्या कानावर स्पष्टपणे घातली आहे. पण त्याचवेळी आपण घ्याल त्या निर्णयसोबत आम्ही राहू, असेही ठाकरे यांना त्यांनी सांगितले आहे. शिवसेनेचे बहुतेक आमदार युतीसाठी अनुकूल असल्याचेही म्हटले जाते.पक्षाच्या काही जिल्हा पदाधिकाºयांशी ठाकरे यांनी सोमवारी मातोश्रीवर चर्चा केली आणि त्यांची मते जाणून घेतली. भाजपासोबत फरफट होण्यापेक्षा एकदा नुकसान झाले तरी चालेल, पण स्वबळावर लढले पाहिजे, असा सूर पदाधिकाºयांनी या वेळी आळविल्याची माहिती आहे.स्वबळावर लढण्याससंदर्भात या पदाधिकाºयांकडून आग्रह धरला जात असल्याच्या बातम्या पसरल्या आणि शिवसेनेच्या खासदारांमध्ये अस्वस्थता पसरली. त्यातूनच एक-दोन दिवसांत शिवसेना सरकारमधून बाहेर पडणार असल्याच्या बातम्या पसरल्या आणि राजकीय चर्चेला उधाण आले. शिवसेना एनडीएमधून बाहेर पडणार का, याबाबतही तर्कवितर्क सुरू झाले. शिवसेनेच्या नेत्यांशी याबाबत संपर्क होऊ शकला नाही. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेशी युती होण्यासंदर्भात भाजपा निश्चिंत आहे. युती नक्कीच होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी पुन्हा एकदा व्यक्त केला.

टॅग्स :शिवसेनाराजकारण