Join us  

बारावी परीक्षेवर बहिष्कार टाकणार, शिक्षक महासंघाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2018 4:23 AM

राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी ‘कामबंद’ आंदोलन करत, शुक्रवारी ‘जेलभरो’ आंदोलन केले. डिसेंबर महिन्यापासून पुकारलेल्या आंदोलनाचा हा चौथा टप्पा आहे. यानंतरही सरकारने मान्य केलेल्या मागण्यांची अंमलबजावणी केली नाही, तर पाचव्या टप्प्यात बारावी परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने दिला आहे.

मुंबई - राज्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी ‘कामबंद’ आंदोलन करत, शुक्रवारी ‘जेलभरो’ आंदोलन केले. डिसेंबर महिन्यापासून पुकारलेल्या आंदोलनाचा हा चौथा टप्पा आहे. यानंतरही सरकारने मान्य केलेल्या मागण्यांची अंमलबजावणी केली नाही, तर पाचव्या टप्प्यात बारावी परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने दिला आहे.महासंघाच्या महाविद्यालय बंद आंदोलनामुळे विविध कनिष्ठ महाविद्यालयांतील सराव परीक्षा शुक्रवारी रद्द करण्यात आल्या. महासंघाने सांगितले की, शिक्षकांच्या सरकारने मान्य केलेल्या मागण्यांची अंमलबजावणी आणि प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी डिसेंबरपासून आंदोलन सुरू आहे. आज सर्व जिल्ह्यांतील शिक्षणाधिकारी कार्यालयांसमोर आणि मुंबईत आझाद मैदानात ‘जेलभरो’ आंदोलन केले आहे, तरीही सरकार उदासीन दिसत आहे. परिणामी, तत्काळ मागण्या मान्य न झाल्यास बारावी बोर्डाच्या परीक्षेच्या काळातही बहिष्कार आंदोलन करण्यात येईल.महासंघाने जुन्या पेन्शन योजनेसह २०९१२ सालापासूनच्या शिक्षकांना नियुक्ती मान्यता व वेतन देण्याची प्रमुख मागणी केली आहे. सोबतच सर्व शिक्षकांना २४ वर्षांच्या सेवेनंतर निवडश्रेणी देणे, कायम विना अनुदानित शिक्षकांना अनुदान द्यावे, माहिती तंत्रज्ञान शिक्षकांना अनुदान द्यावे, २००३ ते ११ पर्यंतच्या वाढीव पदांवरील शिक्षकांना नियुक्ती मान्यता व वेतन द्यावे, अशा विविध ३२ मागण्या केल्या आहेत.

टॅग्स :शिक्षकसंप