Join us

आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला पळविले

By admin | Updated: March 15, 2015 22:44 IST

डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अज्ञानाचा फायदा घेवून अल्पवयीन तरूणीस पळवून नेल्याची तक्रार कासा पोलीस ठाण्यात मुलीच्या वडीलांनी केली आहे.

कासा,: डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अज्ञानाचा फायदा घेवून अल्पवयीन तरूणीस पळवून नेल्याची तक्रार कासा पोलीस ठाण्यात मुलीच्या वडीलांनी केली आहे.सलीम सलमतुला शेख हे चारोटी (खडकीपाडा) येथे आपल्या कुटुंबासोबत राहत असून त्याचा फळविक्रीचा व्यवसाय आहे. त्याची मुलगी तब्बसुम (१७) ही काल बाहेर गेली असता घरीच परत न आल्याने तीला पळवून नेल्याचा संशय पालकांनी वर्तविला आहे. गेल्या तीन वर्षापूर्वी तब्बसुम ही इयत्ता ९ वीत शिक्षण घेत असताना खेळाच्या मैदानात पडली असता तिला डोक्याला मार लागला होता. त्यामुळे तिला कधी कधी झटके येत असत. वडीलांनी तिच्यावर बऱ्याच ठिकाणाहून औषध उपचार करूनही फरक न पडल्याने तिला शाळेत काढून घरीच ठेवले.दरम्यान तब्बसुम हिला झटका आला की,ती कधी कधी कुठेही निघून जात असे. काल संध्याकाळी ७.३० वा. च्या सुमारास ती घरातून निघून गेली असता घरच्यानी आजूबाजूला खूप शोध घेतला परंतु तिचा शोध न लागल्याने तिच्या अवस्थेचा फायदा घेऊन कोणी तरी तिला आमीष दाखवून पळवून नेले असावे असे पालकांचे म्हणणे असून तसा गुन्हा अज्ञात व्यक्ती विरोधात कासा पोलीस ठाण्यात दाखल झाला असून पोलीस मुलीचा व आरोपीचा शोध घेत आहेत. (वार्ताहर)