Join us
Daily Top 2Weekly Top 5

सीमारेषा पुसरली जावी!

By admin | Updated: June 3, 2014 23:40 IST

भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेट संबंध पुनरुज्जीवित व्हावेत, अशी अपेक्षा माजी क्रिकेटपटू व्ही.व्ही.एस. लक्ष्मण आणि सईद किरमाणी यांनी व्यक्त केली.

विनय नायडू - मुंबई
भारत आणि पाकिस्तानमधील क्रिकेट संबंध पुनरुज्जीवित व्हावेत, अशी अपेक्षा माजी क्रिकेटपटू व्ही.व्ही.एस. लक्ष्मण आणि सईद किरमाणी यांनी व्यक्त केली. मंगळवारी रात्री झालेल्या सीएट क्रिकेट पुरस्कार सोहळ्य़ात पाकिस्तानचा रमिझ राजा यानेही प्रतिष्ठीतांसमोर ही सीमारेषा पुसली जावी, असे मत व्यक्त केले.
पाकिस्तानचे पंतप्रधान यांची नुकतीच भारत भेट झाली, त्यामुळे हे पहिले सकारात्मक पाऊल असल्याचे सांगून राजाने क्रिकेटमध्येही असाच बदल होईल, अशी आशा व्यक्त केली. नवाझ शरीफ हे प्रथम श्रेणीचे क्रिकेट खेळले आहेत. माजी कर्णधार इम्रान खान आणि आपण ज्या लाहोर क्लबकडून खेळलो, त्याच क्लबकडून शरीफही खेळले, असे सांगून राजाने तसेच ते उत्कृष्ट फलंदाज  असल्याचा दाखलाही यावेळी दिला. 
आम्ही विश्वचषक जिंकल्यानंतर अधिकृत डिनरच्यावेळी शरिफ म्हणाले, ‘तुङया दोन बाबी मला सतावत आहेत. पहिली ही की, तुङया विवाहाला मला बोलाविले नाहीस आणि दुसरी गोष्ट अशी की, तु घेतलेला ङोल!’ त्यावर मी उत्तरलो ‘मी ङोल घेण्याचा प्रयत्न केला नसता, पण मी तुम्हाला ओळखले होते की तुम्ही आमचे पुढील पंतप्रधान असाल म्हणून’, यावर उपस्थितांत हश्शा पिकला. वेस्ट इंडिजच्या गोलंदाज आणि शरीफ यांच्यातील किस्साही यावेळी राजाने सांगितला. 1987 च्या विश्वषचक स्पर्धेवेळी आम्हाला काही सराव सामने खेळण्यासाठी वेस्ट इंडीजला आमंत्रित केले होते. शरीफ यांनी वेस्ट इंडीजच्या गोलंदाजांविरुद्ध फलंदाजी करण्याची इच्छा प्रकट केली. त्यावेळी आम्ही पॅट्रीक पॅटरसनला हळुवार गोलंदाजी करण्याचा सल्ला दिला. मात्र, त्याने पाच चेंडू बाऊन्सर टाकले आणि सहावा चेंडू मधल्या यष्टीवर टाकल्यावर तेव्हा पेच निर्माण झाला होता, असे सांगून राजाने दुसरा पत्ता उघड केला. लाईफटाईम अच्युवमेंट अॅवार्ड माजी क्रिकेटपटू सईद किरमाणी यांनीही भारत पाक यांच्यातील 1979 आणि 1981 च्या मालिकांतील काही प्रसगांना उजाळा दिला. आम्ही तेरा वर्षानंतर एकमेकांविरुद्ध खेळत होतो, तेव्हा बिशनसिंग बेदी कर्णधार होता. संघव्यवस्थापक फत्तेसिंगराव गायकवाड यांनी पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष ङिाया उल हक यांच्याशी माझा परिचय करून देताना आपल्या भारदस्त आवाजात सांगितले, ‘दिज इज सईद मुस्तफा हुसैन किरमाणी.’ त्यानंतर 1981 मध्ये पाकदौ:यावर भारतीय संघ गेला. त्यावेळी कर्णधार सुनील गावसकरने राष्ट्राध्यक्ष ङिाया उल हक यांना ‘दीस इज सईद किरमाणी’ अशी माझी ओळख करून दिली. त्यानंतर काही वेळाने हक यांनी ‘व्हेअर इज युवर विकेटकिपर सईद किरमाणी?’ असा सवाल केला. त्यावेळी गावसकर म्हणाला, सर, आपण आत्ताच त्याला भेटलात. त्यावर मी तत्काळ मंचावर जाऊन म्हणालो, ‘सर, हा माझा नवा लूक आहे.’ शैलिदार खेळाडू लक्ष्मण म्हणाला की, पाकिस्तानमधील लोक खेळावर निस्सीम प्रेम करतात.