मुंबई: एका महिला पोलिसासह दोन पोलीस कर्मचाऱ्यांना एका मद्यपीकडून मारहाण करण्यात आली. हा प्रकार कुरार पोलीस ठाण्यात मंगळवारी रात्री घडला. या प्रकरणी एका मद्यपीला अटक करण्यात आली आहे.मंगल संतोष यादव (३६) असे या इसमाचे नाव आहे. तो कुरार परिसरातच राहतो. कुरार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी रात्री यादव दारू पिऊन धिंगाणा घालू लागला. बराच वेळ तो शेजाऱ्यांना शिवीगाळ करत होता. त्यामुळे त्यांनी केलेल्या तक्रारीवरून कुरार पोलिसांनी यादवला पोलीस ठाण्यात आणले. ‘वरिष्ठ पोलीस निरीक्षक लिंबण्णा व्हनमाने यांच्या केबिनमध्ये त्याला बसवून ठेवले होते. त्याची चौकशी करण्यास सुरुवात केली, तेव्हा त्याने एका महिला पोलीस कॉन्स्टेबलच्या श्रीमुखात भडकवली. त्याला रोखण्यासाठी गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्यालाही मारहाण केली. त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली. त्याला १४ आॅक्टोबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
महिला पोलिसासह दोघांना मद्यपीची मारहाण
By admin | Updated: October 14, 2016 07:02 IST