Join us
Daily Top 2Weekly Top 5

दोन्ही रेल्वेचा रविवारी नो ब्लॉक डे

By admin | Updated: December 6, 2014 00:35 IST

महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत आलेल्या लांबच्या प्रवाशांसह येथील नागरिकांना परतीच्या प्रवासात गैरसोय होऊ नये,

डोंबिवली : महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत आलेल्या लांबच्या प्रवाशांसह येथील नागरिकांना परतीच्या प्रवासात गैरसोय होऊ नये, यासाठी मध्य रेल्वेसह पश्चिम रेल्वेने रविवारी मेगा-जम्बोब्लॉक न घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे लाखो प्रवाशांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. सणासुदीच्या काळात ब्लॉक घेण्यात येऊ नये, अशी मागणी ठिकठिकाणच्या प्रवासी संघटनांनी वेळोवेळी केली. त्या मागणीला न्याय देत हा निर्णय घेतल्याचे समाधान असल्याचे संघटनेने प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे. (प्रतिनिधी)