Join us
Daily Top 2Weekly Top 5

आरे कॉलनी सामुहिक बलात्कारप्रकरणी दोघे अटकेत

By admin | Updated: May 3, 2014 14:52 IST

गोरेगाव आरे कॉलनी येथील सामुहिक बलात्कार प्रकरणातील दोघा आरोपींना तामिळनाडू येथील त्यांच्या मूळ गावी पळून जाण्याच्या तयारीत असताना गुन्हे शाखेने दादर येथे अटक केली

मुंबई: गोरेगाव आरे कॉलनी येथील सामुहिक बलात्कार प्रकरणातील दोघा आरोपींना तामिळनाडू येथील त्यांच्या मूळ गावी पळून जाण्याच्या तयारीत असताना गुन्हे शाखेने दादर येथे अटक केली. वेल्लीपांडी मालेअप्पन देवेंद्र (२९), जयराज तंगराज पल्लन देवेंद्र (२७) अशी आरोपींची नावे आहेत.या दोघा आरोपींविरूद्ध आरे पोलीस ठाणे व अन्य ठिकाणी खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी आदी गुन्‘ांची नोंद आहे. या चौघा आरोपींची टोळी असून आरोपी वेलीपांडी देवेंद्र हरिजन हा टोळीचा प्रमुख आहे. आरे पोलीस अन्य आरोपींचा शोध घेत आहेत. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना १२ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.