Join us

बोरीवलीत पोलिसाला फरफटत नेले

By admin | Updated: April 22, 2015 03:42 IST

एका मोटारसायकलस्वाराला वाहनाचा परवाना विचारणाऱ्या पोलीस हवालदाराला चालकाने फरफटत नेल्याची घटना मंगळवारी बोरीवलीतील देविदास लेन येथे घडली.

मुंबई : एका मोटारसायकलस्वाराला वाहनाचा परवाना विचारणाऱ्या पोलीस हवालदाराला चालकाने फरफटत नेल्याची घटना मंगळवारी बोरीवलीतील देविदास लेन येथे घडली. या अपघातात बोरीवली पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार जगदीश झेंडे हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी सागर घोसालिया (२०) याला अटक केली आहे. झेंडे यांनी सागरची मोटारसायकल थांबवली तेव्हा गाडी पार्क करून घरी रिक्षाने जातो आणि परवाना आणतो, असे सांगत तो गाडीसह पसार होण्याच्या तयारीत होता. त्याला पकडण्यासाठी झेंडे यांनी पकडले असता जवळपास १०० मीटर अंतर झेंडे यांना तो फरफटत घेऊन गेला. झेंडे यांच्यावर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.