Join us

बोरिवली ठाणे भुयारी मार्गच्या कामाला होणार लवकर सुरुवात

By मनोहर कुंभेजकर | Updated: April 10, 2025 20:16 IST

८७ बाधित झोपडपट्टीधारकांचे झाले तात्पुरते पुनर्वसन

मनोहर कुंभेजकर, मुंबई-मागठाणे विधानसभा क्षेत्रातील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळील  ठाणे ते मागाठाणे या भुयारी प्रकल्पा मधील अडथळा ठरणाऱ्या ८७ बाधित होणाऱ्या झोपडपट्टीधारकांचे तात्पुरते पुनर्वसन करण्यात आले.त्यामुळे बोरिवली ठाणे भुयारी मार्गच्या कामाला लवकरच सुरवात होणार असून भविष्यात सदर अंतर २० मिनिटांत पार करणे शक्य होणार आहे.

यासाठी शिंदे सेनेचे स्थानिक आमदार प्रकाश सुर्वे यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्यात समवेत झालेल्या बैठकीमध्ये सदर ८७ नागरिकांना घरे देण्याबाबत ठराविण्यात करण्यात आले. त्यानुसार काही दिवसांपूर्वीच विकासक  मोहित कंबोज, एम.एम.आर.डी. ए चे अधिकारी, एस.आर.ए चे अधिकारी आणि भुयारी प्रकल्प अधिकारी यांची स्थानिक नागरिकांसमवेत संयुक्त बैठक संपन्न झाली. स्थानिक नागरिकांसमवेत घेऊन या गोष्टीचा उलगडा करण्यात आला होता. त्यानुसार प्रकल्प बाधित नागरिकांना त्यांच्या घराच्या चाव्या वाटप करण्यात आल्या अशी माहिती आमदार प्रकाश सुर्वे यांनी दिली.

यावेळी उपजिल्हाअधिकारी रोहिणी फडतरे, उपसामाजिक विकास अधिकारी पंकज सोनवणे आणि शिंदे सेनेचे संजय सिंघन, मनोहर देसाई, शाखाप्रमुख कौस्तुभ म्हामुणकर, वैभव भराडकर आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :प्रकाश सुर्वे