Join us
Daily Top 2Weekly Top 5

बोरीवलीत एसटीचा अत्याधुनिक बस पोर्ट

By admin | Updated: March 20, 2016 02:28 IST

बोरीवलीच्या पूर्वेकडील नॅन्सी कॉलनीमधील एसटी महामंडळाचा बस डेपो अत्यंत वाईट असल्याने तिथे नव्याने अत्याधुनिक बस पोर्ट बांधण्यात येणार असल्याची

मुंबई : बोरीवलीच्या पूर्वेकडील नॅन्सी कॉलनीमधील एसटी महामंडळाचा बस डेपो अत्यंत वाईट असल्याने तिथे नव्याने अत्याधुनिक बस पोर्ट बांधण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेचे आ. प्रकाश सुर्वे यांनी दिली. राज्याचे परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी बस पोर्टला तत्त्वत: मान्यता दिली आहे, असे ते म्हणाले. नॅन्सी कॉलनी येथील बस डेपोची दुरवस्था झाली असून, तिथे पिण्याच्या पाण्याची सोय नाही. स्त्रियांसाठी स्वच्छतागृह नाही, पुरुषांसाठी असलेले स्वच्छतागृह मोडकळीस आलेले असून, ते कायमच अस्वच्छ असते. त्यामुळे तिथे बस पोर्ट उभारण्यात यावा, अशी मागणी गेली दोन वर्षे सातत्याने करीत होतो, असे आ. सुर्वे यांनी सांगितले.