Join us

बोरघाट-खंडाळा घाट झाला भक्तिमय

By admin | Updated: November 14, 2014 22:54 IST

कार्तिकी एकादशी निमित्ताने आळंदीमध्ये होणा:या सोहळय़ासाठी कोकणातून शेकडो दिंडय़ा खोपोलीत मुक्काम करून मार्गस्थ झाल्या आहेत.

खालापूर : कार्तिकी एकादशी निमित्ताने आळंदीमध्ये होणा:या सोहळय़ासाठी कोकणातून शेकडो दिंडय़ा खोपोलीत मुक्काम करून मार्गस्थ झाल्या आहेत. यात मानाच्या समजल्या जाणा:या कोकण दिंडीचे शुक्रवारी सकाळी प्रस्थान झाले. विठ्ठल भक्तांनी संपूर्ण बोरघाट भगवामय आणि विठूनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. 
कार्तिकी एकादशीनंतर कोकणातील वारक:यांची पावले आळंदीच्या दिशेकडे वळू लागतात. कोकण दिंडीच्या माध्यमातून खालापूर, पनवेल, चौक, कर्जत, अलिबाग, पाली, रोहा, उरण, नवी मुंबई, बदलापूर, अंबरनाथ, ठाणो, कल्याण, महाड आदी भागातून शेकडो दिंडय़ांनी गुरुवारी खोपोली शहरात मुक्काम करून शुक्रवारी सकाळी आळंदीकडे प्रस्थान केले.  
कोकण दिंडीच्या माध्यमातून वारकरी विठूनामाचा जयघोष करीत बोरघाट, खंडाळा अवघड घाट पार करीत लोणावळामार्गे आळंदीकडे मार्गस्थ झालेत. नारंगी गावातून आदिवासी दिंडीत यंदाही युवक - युवतींचा सहभाग मोठा आहे. 
 
न्याहरीची चवच न्यारी : गेल्या काही वर्षापासून खोपोली शहरातील सामाजिक कार्यकर्ते माजी नगराध्यक्ष रामदास शेंडे यांचे कुटुंबीय कोकण दिंडीमधील वारक:यांसाठी बोरघाटात न्याहारीची सुविधा उपलब्ध करून देत आहेत. त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे सर्वच वारक:यांकडून कौतुक होत आहे.