घोडबंदर : तहानेने त्रस्त असलेल्या मुंब्रा-दिवा आणि घोडबंदर क्षेत्नाची तृष्णा भागविण्यासाठी ठाणो महापालिकेने येथील पाणी टंचाई दूर करण्यासाठी केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान अभियान (जेएनएनयूआरएम) मधून 428 कोटी 6क् लाखांचा निधी जलवाहिनीच्या विस्तारीकरणासाठी मंजूर करून घेतला होता. मात्न, हे काम अद्याप मार्गी लागलेले नाही. केंद्रातील सरकार बदलल्यामुळे हा निधी पालिकेच्या पदरात पडणार का? याची चाचपणी सुरू झाली आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी या विभागातील पाणी प्रश्न ऐरणीवर आला होता. घोडबंदरमधील नागरिकांनी पाणीसमस्या सोडवली तरच मतदानाचा निर्णय जाहीर केला होता. तर दिव्यातील नागरिकांनी मोर्चा काढून ठाणो महापालिकेला जाब विचारला होता. तेव्हा राजकीय पुढा:यांनी, प्रशासकीय अधिका:यांनी हा पाणी प्रश्न डिसेंबर अखेर मार्गी लावू, असे आश्वासन दिले होते. येथील लोकसंख्या मोठय़ा प्रमाणावर वाढल्याने जलवाहिन्यांचा नव्याने विस्तार करून पाणी प्रश्न सोडविण्यासाठी केंद्राकडून या पाणी वितरण व्यवस्थेकरिता मुंब्य्रासाठी 126 कोटी 79 लाख तर घोडबंदर विभागासाठी 3क्1 कोटी 91 लाखांचा निधी मंजूर करून घेतला होता. घोडबंदरचे काम साकेत येथून सुरू करताना मलवाहिन्यांचा अडथळा येणार असल्याचे प्रशासनाच्या लक्षात आले. त्यामुळे, मलवाहिन्यांसाठी मंजूर असलेल्या 249 कोटी 42 लाखांच्या निधीचे पाणीवितरणाच्या कामात सहभाग करून निविदा काढण्याचे निश्चित झाले होते. ही प्रक्रिया सुरू असतानाच केंद्रात सत्ताबदल झाला आणि काम रखडले. (वार्ताहर)
च्पाणी खात्याचे कार्यकारी अभियंता मंगेश गीते यांना विचारले असता या कामांची पूर्ण तयारी प्रशासनाकडून सुरु आहे.
च्परंतु,हा निधी केंद्रशासनाकडे शिल्लक आहे का, हे तपासून पुढील निर्णय घेण्यात येईल,असे त्यांनी सांगितले.