Join us
Daily Top 2Weekly Top 5

म्हाडा कर्मचाऱ्यांना बोनस मंजूर

By admin | Updated: November 4, 2015 03:17 IST

दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपल्याने, सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सानुग्रह अनुदानाची चर्चा सुरू आहे. यंदा म्हाडा कर्मचाऱ्यांना प्रशासनाने १२ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान

मुंबई : दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपल्याने, सर्व शासकीय कार्यालयांमध्ये सानुग्रह अनुदानाची चर्चा सुरू आहे. यंदा म्हाडा कर्मचाऱ्यांना प्रशासनाने १२ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान मंजूर केले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.राज्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती असल्याने, दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी म्हाडातील कर्मचारी सरसावले आहेत. यापूर्वी काही कर्मचाऱ्यांनी दुष्काळग्रस्तांना मदत करत, आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे. म्हाडाच्या विद्युत विभागात कार्यरत असलेले बालकृष्ण जदाल यांनी बोनस दुष्काळग्रस्तांना देण्याचा निर्णय घेतला आहे.