Join us

'BMC' निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'MumbaiWiFi'

By admin | Updated: January 9, 2017 17:17 IST

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून मुंबई शहरातील प्रमुख ठिकाणी वायफाय सेवा सुरु करण्यात आली आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 09 - मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून मुंबई शहरातील प्रमुख ठिकाणी वायफाय सेवा सुरु करण्यात आली आहे. 
याबाबत खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे. मुंबईतील पहिल्या टप्प्यात ठिकठिकाणी जवळपास 500 वायफाय हॉटस्पॉट बसविण्यात आले आहेत. प्रामुख्याने मुंबईतील पोलीस आयुक्तालय, विधान भवन, बांद्र्यातील कलानगर आणि मुंबई उच्च न्यायालय या ठिकाणासह पूर्व आणि पश्चिम उपनगरातील काही भागात वायफाय सेवा सुरु करण्यात आली आहे. 2 जानेवारी ते 8 जानेवारी यादरम्यान वायफायची चाचणी घेण्यात आली. यावेळी एकूण 23,000 युजर्संकडून वायफायचा वापर करण्यात आला. तसेच, दोन टीबी पेक्षा जास्त डेटा डाऊनलोड करण्यात आला, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी म्हटले आहे. 
मुंबईला वायफाय शहर बनविण्यात येणार असून 1मे 2017 पर्यंत संपूर्ण मुंबईत 1200 वायफाय हॉटस्पॉट बसविण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली केली. 
 
(मे २०१७ पर्यंत मुंबईत वायफाय)