Join us

बॉम्बेऐवजी होणार ‘मुंबई हायकोर्ट’ नाव?

By admin | Updated: May 28, 2014 01:28 IST

बॉम्बे हायकोर्टचे मुंबई हायकोर्ट असे नामकरण करण्यात यावे, या मनसेच्या मागणीचा सकारात्मक विचार करण्याचे निर्देश राष्ट्रपतींच्या सचिवालयाने केंद्रीय विधी मंत्रालयाच्या सह सचिवांना दिले आहेत.

कोळसेवाडी : बॉम्बे हायकोर्टचे मुंबई हायकोर्ट असे नामकरण करण्यात यावे, या मनसेच्या मागणीचा सकारात्मक विचार करण्याचे निर्देश राष्टÑपतींच्या सचिवालयाने केंद्रीय विधी मंत्रालयाच्या सह सचिवांना दिले आहेत. याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचेही आदेश राष्टÑपती भवनाचे दुय्यम सचिव चिराब्राता सरकार यांनी दिले आहेत. बॉम्बे हायकोर्टऐवजी मुंबई हायकोर्ट करण्याची मागणी कल्याण मनसेचे शहर सचिव सचिन बोबडे यांनी २७ फेब्रुवारी २०१४ रोजी जागतिक मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून राष्टÑपतींसह पंतप्रधान आणि महाराष्टÑाचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. गुवाहाटीचे गोहत्ती, पाँडेचरीचे पदुचेरी, त्रिवेंद्रमचे तिरुअनंतपुरम, कोलकात्याचे कोलकता अशी लोकभावनांची कदर करुन प्रत्येक राज्यात अनेक नावे बदलण्यात आली आहेत. मात्र, बॉम्बे हायकोर्ट हा इंग्रजीतून ब्रिटीश राजवटीपासून रुढ झालेला उल्लेख मराठी लोकांना खटकणारा वाटतो. महाराष्टÑातील तमाम मराठी जनांच्या वतीने तीव्र जनभावनांची दखल घेऊन बॉम्बे ऐवजी ‘मुंबई हायकोर्ट’ असे नामकरण करण्याचे आदेश देण्याची मागणी केली आहे. त्याच मागणीची दखल राष्टÑपती भवनातून घेण्यात येऊन संबंधित विभागाला २ एप्रिल २०१४ रोजी त्याबाबतचे पत्रही दिले आहे. या पत्रानुसार मनसेच्या मागणीची दखल घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. न्यायालयाचा मान राखूनही मनसेला अशी मागणी करावीशी वाटली. (वार्ताहर)