Join us

बोईसरचे ग्रामीण रूग्णालय साडेतीन महिने अंधारात!

By admin | Updated: April 19, 2015 23:53 IST

येथील ग्रामीण रूग्णालयातील वीज पूरवठा खंडित करण्यात आल्याने मागील तीन महिन्यांपासून डॉक्टर अंधारात रुग्णांवर उपचार करीत असल्याने रुग्णांचे

पंकज राऊत, बोईसरयेथील ग्रामीण रूग्णालयातील वीज पूरवठा खंडित करण्यात आल्याने मागील तीन महिन्यांपासून डॉक्टर अंधारात रुग्णांवर उपचार करीत असल्याने रुग्णांचे आरोग्य धोक्यात आले आहे. विशेष म्हणजे, अत्यावश्यक सेवेसाठी जनरेटरवर लावण्यात येत आहे. मात्र याचा खर्च वाढत असून निघणाऱ्या धुरामुळे परिसरातील नागरिकही त्रस्त झाले आहे.तारापूर औद्योगिक वसाहतीतील कामगारांबरोबरच बोईसर पूर्व भागातील नागरिक मोठ्या संख्येने या रूग्णालयात उपचार घेण्यासाठी जातात. प्रतिदिन सुमारे दोनशे रूग्णांवर उपचार करण्यात येत असून काही अत्यवस्थ रूग्णांना दाखल करण्यात येते. सोबतच अटक केलेल्या आरोपींचीही वैद्यकीय तयापणी येथेच केली जाते.या रुग्णालयाचे ५९ हजार ९७२ रुपयांचे बिल थकल्याने वीज कंपनीने वीज पुरवठा खंडित केला आहे. काही औषधे व इंजेक्शने विशिष्ट तापमानाखाली ठेवावे लागते. मात्र वीजपुरवठाच नसल्याने या औषधांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यासंदर्भात येथे कार्यरत डॉ. माया सोनावणे-नाईक यांच्याशी संपर्क साधला असता, जनरेटरकरिता जे डिझेल लागते त्याचा खर्च ओपीडीमधून केस पेपरच्या माध्यमातुन आलेल्या पैशातून भागविनत असल्याचे सांगितले.