Join us

बोईसरमध्ये पावणेचार लाखांची चोरी

By admin | Updated: September 26, 2014 01:22 IST

पप्पांनी मला फाईल घेण्यासाठी पाठविले आहे असा बहाणा करून घरात शिरलेल्या एका अनोळखी चोराने दिवसा-ढवळ्या ३ लाख ८८ हजार ४८१ रू. चे सोन्याचे दागिने चोरले

बोईसर : पप्पांनी मला फाईल घेण्यासाठी पाठविले आहे असा बहाणा करून घरात शिरलेल्या एका अनोळखी चोराने दिवसा-ढवळ्या ३ लाख ८८ हजार ४८१ रू. चे सोन्याचे दागिने चोरले. केशव अपार्टमेंटच्या नाईक नगर मधील रु. नं. ३०२ मध्ये राहणाऱ्या वाघाराम माळी (३४) यांची मुलगी मानसी (९) ही घरामध्ये एकटीच असताना अनोळखी इसमाने मुलीकडे पाणी मागितले. ती किचन मध्ये गेली असता बेडच्या खाली ठेवलेल्या चाव्यांनी कपाट उघडून दागिने लांबविले. (वार्ताहर)