Join us

जलयुक्त शिवार योजनून बोगस बिले लाटली

By admin | Updated: August 14, 2015 01:01 IST

आघाडी सरकारच्या काळातील योजनांचे एकत्रीकरण करुन ‘जलयुक्त शिवार योजना’ राबविण्यात येत आहे. मात्र, भाजपाचे कार्यकर्ते या योजनेच्या माध्यमातून

मुंबई : आघाडी सरकारच्या काळातील योजनांचे एकत्रीकरण करुन ‘जलयुक्त शिवार योजना’ राबविण्यात येत आहे. मात्र, भाजपाचे कार्यकर्ते या योजनेच्या माध्यमातून शासनाची फसवणूक करीत असून करोडो रुपयांची बोगस बिले लाटली जात आहेत. त्यामुळे येत्या पंधरा दिवसात सोशल आॅडीटच्या माध्यमातून राज्यातील जलयुक्त शिवार योजनेच्या कामांची माहिती तसेच त्यासाठी मिळालेली लोकवर्गणी जनतेसमोर मांडण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत मलिक बोलत होते. ते म्हणाले की,‘आज अमुक संघटनेने जलयुक्त शिवार योजनेसाठी सरकारला पाच लाख रुपये दिले, अशा स्वरुपाच्या किमान दोन-चार बातम्या रोज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ट्विटर अकाउंटवरुन येत आहेत. राज्यात ९० हजार ठिकाणी जलयुक्त शिवार अभियानाची कामे सुरु असल्याचे मुख्यमंत्र्यांनी विधानसभा तसेच सार्वजनिक भाषणातून सांगितले. लोकसहभागातून राबविण्यात येणा-या योजनेसाठी आतापर्यंत किती वर्गणी मिळाली, तसेच किती लोकांनी श्रमदान केले याची माहिती सोशल आॅडीटमधून जनतेसमोर ठेवावी, अशी मागणी मलिक यांनी केली.