Join us

विहार लेकमध्ये बुडालेला तरुणाचा मृतदेह सापडला

By admin | Updated: July 5, 2016 20:22 IST

विहार लेकमध्ये बुडालेल्या तरुणाचा अखेर दोन दिवसानंतर मृतदेह सापडला. शिबू राठोड (३८) असे मृत तरुणाचे नाव असून तो पोहण्यासाठी विहार लेकमध्ये उतरला होता.

ऑलाइन लोकमतमुंबई, दि. ५ : विहार लेकमध्ये बुडालेल्या तरुणाचा अखेर दोन दिवसानंतर मृतदेह सापडला. शिबू राठोड (३८) असे मृत तरुणाचे नाव असून तो पोहण्यासाठी विहार लेकमध्ये उतरला होता. अंधेरी येथील रहिवासी असलेला राठोड बिगारी काम करायचे. रविवारी सुट्टी असल्याने मित्रांसोबत विहार लेकमध्ये पोहण्यासाठी आले होते. दारुपार्टीचा बेत उरकल्यानंतर राठोड पाण्यात उतरले. मात्र खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडायला लागले. रात्री उशिरापर्यंत त्याचा शोध घेतल्यानंतर याबाबत मुलुंड पोलिसांना कळविण्यात आले. अग्निशमन दलासह मुलुंड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत राठोडचा शोध सुरु केला. अखेर मंगळवारी सायंकाळच्या सुमारास राठोडचा मृतदेह पोलिसांना सापडला. मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. मुलुंड पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.