Join us

रुग्णाचा मृतदेह रेल्वे ट्रकवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2018 05:18 IST

शताब्दी रुग्णालयात उपचार घेणा-या एका २६ वर्षीय रुग्णाचा मृतदेह कांदिवली रेल्वे ट्रॅकवर सापडल्याने खळबळ उडाली आहे.

मुंबई : शताब्दी रुग्णालयात उपचार घेणा-या एका २६ वर्षीय रुग्णाचा मृतदेह कांदिवली रेल्वे ट्रॅकवर सापडल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रुग्णालय प्रशासन चौकशी करत आहे. या घटनेमुळे रुग्णालयाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.साईनाथ भीवा राखाडे (२६) असे मयत तरुणाचे नाव आहे. दंगलीत सहभाग असल्याच्या आरोपात त्याला कुरार पोलिसांनी अटक केली होती. पाच महिने कारागृहात शिक्षा भोगून तो बाहेर आला होता. अशक्तपणामुळे त्याला २६ जानेवारीला शताब्दी रुग्णालयात दाखल केले होते. १ फेब्रुवारीला त्याचा मृतदेह कांदिवली रेल्वे ट्रॅकवर आढळला. तो रुग्णालयातून बाहेर कसा पडला, असा प्रश्न नातेवाइकांनी केला आहे.