Join us
Daily Top 2Weekly Top 5

मॉडेलचा मृतदेह आढळला

By admin | Updated: June 13, 2017 01:42 IST

बॉलीवूडमध्ये काम करण्याच्या आकर्षणापोटी हरिद्वारहून मुंबईत आलेल्या एका २५ वर्षांच्या मॉडेलला जीव गमवावा लागला. कृतिका चौधरी असे तिचे नाव आहे

- लोकमत न्युज नेटवर्क

मुंबई : बॉलीवूडमध्ये काम करण्याच्या आकर्षणापोटी हरिद्वारहून मुंबईत आलेल्या एका २५ वर्षांच्या मॉडेलला जीव गमवावा लागला. कृतिका चौधरी असे तिचे नाव आहे. अंधेरीतील रहात्या फ्लॅटमध्ये ती मृतावस्थेत आढळून आली आहे. मॉडेलिंग करीत असलेली कृतिका चौधरी ही अंधेरी पश्चिमच्या चार बंगला परिसरात भैरवनाथ एसआरए सोसायटीत भाड्याने फ्लॅट घेऊन रहात होती. तिच्या फ्लॅटमधून उग्र वास येऊ लागल्याने सोमवारी सायंकाळी शेजाऱ्यांनी पोलीस नियंत्रण कक्षाला कळविले. त्यानुसार अंबोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत फ्लॅटचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविला आहे. तीन ते चार दिवसांपूर्वी तिचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.