Join us
Daily Top 2Weekly Top 5

बुडालेल्या मुलाचा मृतदेह सापडला

By admin | Updated: April 20, 2017 03:05 IST

जुहू समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या शाहिद असिफ शेख (१७) या मुलाचा मृतदेह दोन दिवसांनी सापडला. या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे

मुंबई : जुहू समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या शाहिद असिफ शेख (१७) या मुलाचा मृतदेह दोन दिवसांनी सापडला. या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. मंगळवारी उशिरा रात्री सांताक्रुझ चौपाटीजवळ शेखचा मृतदेह पोलिसांना सापडला. जवळपास पावणेचारच्या सुमारास हा मृतदेह पोलीस गस्तीदरम्यान सापडला. त्यानुसार, शेखच्या घरच्यांना याबाबत कळविण्यात आले. हा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. सोमवारी संध्याकाळी शेख हा समुद्रात बेपत्ता झाल्यानंतर, अग्निशमन दलाने सतत दोन दिवस त्याचा शोध घेतला. मात्र, तो त्यांना सापडला नाही.शेख हा जुहू गल्ली परिसरात राहत होता. सोमवारी सकाळी शेख त्याच्या कुटुंबीयांसोबत जुहू चौपाटी फिरण्यासाठी आला होता. दुपारी अडीचच्या सुमारास तो समुद्रात पोहण्यासाठी उतरला आणि भरती असल्याने बुडाला. त्यानंतर सायंकाळी चार वाजता त्याच्या शोध घेण्यासाठी बचाव कार्य सुरु करण्यात आले होते. (प्रतिनिधी)