Join us

बुडालेल्या मुलीचा सापडला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:08 IST

डोंबिवली : हेदुटणे गावातील राणी ढाब्याच्या मागे असलेल्या खदाणीतील पाण्यात कपडे धुण्यासाठी गेलेल्या आई गीता शेट्टीसह परी आणि लावण्या ...

डोंबिवली : हेदुटणे गावातील राणी ढाब्याच्या मागे असलेल्या खदाणीतील पाण्यात कपडे धुण्यासाठी गेलेल्या आई गीता शेट्टीसह परी आणि लावण्या या दोन मुली बुडाल्याची घटना रविवारी दुपारी घडली होती. यात गीता आणि लहान मुलगी परीचा जीव वाचला होता. परंतु त्या दोघींना वाचविण्यासाठी पाण्यात उडी मारलेली मोठी बहीण लावण्या बेपत्ता झाली होती. सायंकाळी उशिरापर्यंत अग्निशमन दलाच्या जवानांकडून तिचा शोध सुरू होता. मात्र, अंधार पडल्यावर शोधकार्य थांबविण्यात आले होते. सोमवारी पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले. त्यात सकाळी १०.३०च्या सुमारास लावण्याचा मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांच्या हाती लागल्याची माहिती अग्निशमन विभागाचे उपस्थानक अधिकारी रवी गोवारी यांनी दिली. या घटनेची मानपाडा पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.