Join us
Daily Top 2Weekly Top 5

गोणीत आढळला दीड वर्षीय मुलाचा मृतदेह

By admin | Updated: June 28, 2017 03:42 IST

मालाडमध्ये सोमवारी संध्याकाळी एक दीड वर्षाचा मुलगा घरातून बेपत्ता झाला होता. त्याचा मृतदेह मंगळवारी सकाळी एका गोणीत सापडला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मालाडमध्ये सोमवारी संध्याकाळी एक दीड वर्षाचा मुलगा घरातून बेपत्ता झाला होता. त्याचा मृतदेह मंगळवारी सकाळी एका गोणीत सापडला आहे. या प्रकरणी मालाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.विवान संदीप कांडू असे या मृत मुलाचे नाव आहे. विवानचे पालक मालाड पश्चिमच्या काचपाडा परिसरात राहतात. सोमवारी संध्याकाळी पाच वाजल्यापासून तो गायब झाला होता. त्यानंतर त्याच्या घरच्यांनी रात्री दोनपर्यंत सगळीकडे त्याचा शोध घेतला. मात्र तो कुठेच सापडला नाही. या प्रकरणी मालाड पोलीस ठाण्यात तक्रारही दाखल करण्यात आली. त्यानुसार पोलीसही त्याचा शोध घेत होते. मात्र मंगळवारी पुन्हा पहाटे विवानचे कुटुंबीय त्याचा शोध घेऊ लागले. तेव्हा त्याच्या काकाच्या घरी त्यांना विवानचा मृतदेह एका गोणीत भरलेल्या अवस्थेत सापडला. विवानची मोठी काकी मनीषा यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी विवानची चुलत बहीण त्याला खेळविण्यासाठी सोबत घेऊन गेली होती. तेव्हापासून तो गायब झाला होता. या प्रकरणी पोलिसांनी अपहरण आणि खुनाच्या गुन्ह्याची नोंद केली आहे. तसेच त्याच्या काकासह तिघांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी सुरू असल्याचेही सूत्रांनी सांगितले.