Join us
Daily Top 2Weekly Top 5

गोराई समुद्रकिनारी सापडला मृतदेह

By admin | Updated: September 12, 2014 22:38 IST

गोराई समुद्रकिनारी सापडला मृतदेह

गोराई समुद्रकिनारी सापडला मृतदेह
बोरीवली: गोराईगाव व मनोरी समुद्रात शुक्रवारी सकाळी एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला आहे. शुक्रवारी सकाळी स्थानिक लोकांना परिसरातून दुर्गंधी आल्यानंतर शोध घेतला असता त्यांना मृतदेह आढळून आला. स्थानिकांनी माहिती दिल्यानंतर गोराई पोलिसांनी घटनास्थळी जावून मृतदेह ताब्यात घेतला. अंदाजे ३० ते ३५ वर्षांच्या इसमाचा मृतदेह असल्याचे पोलिसांनी सांगितले. मृतदेह संपूर्ण कुजलेल्या अवस्थेत असल्याने त्याची ओळख पटलेली नाही. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. मृतदेह नेमका कोणाचा याचा शोध सुरु असल्याचे गोराई पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)