हितेन नाईक, पालघरसातपाटी येथील मासेमारी केंद्र विकसित करण्यासाठी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत कोट्यवधींची कामे सुरू आहेत. लिलावगृहा (बाजार) ची जागा विकसित करण्याबरोबरच त्याच्या बांधकाम कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या बोटीचे सांगाडे अडथळे ठरत आहेत. हे सांगाडे हटविले जात नसल्याने बाजार उभारणीचे काम वर्षभरापासून ठप्प पडले आहे.सातपाटी मुरबे येथील मच्छीमारी नौकानी पकडून आणलेली शेकडो टन मासे विक्रीसाठी सातपाटी मधील रस्त्यावरच ठेवण्यात येतात. यावेळी वाहतुकीचा होणारा खर्च व त्या अनुषंगाने निर्माण होणाऱ्या समस्येमुळे हा मार्ग पहाटे पाच ते सकाळी ९ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी दररोज बंद असतो. महिलांची होणारी गैरसोय पाहता माजी राज्यमंत्री राजेंद्र गावितांच्या प्रयत्नाने राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत ८ कोटी ८८ लाख २८ हजार ८२४ रू. चा निधी प्राप्त झाला होता. यातील जेटी, ओटा बांधणे, शेड बांधणे, इ. ची कामे शेवटच्या टप्प्यात असून लिलाव गृहाची जागा विकसीत करणे आणि लिलावगृह बांधणे हे काम मागील वर्षभरापासुन ठप्प पडून आहे.मत्स्य व्यवसाय विभागाच्या क र्ज आणि व्याजाच्या चक्रात गुरफटलेल्या अनेक मच्छीमार नौका अनेक वर्षभरापासून किनाऱ्यावर पडून आहेत. या नौकाचे आता केवळ सांगाडे उरले असून लिलावगृह उभारणीच्या कामाच्या आड हे सांगाडे अडथळे ठरत आहेत. हे सांगाडे हटवावेत म्हणून सहाय्यक मत्स्य व्यवसाय उपायुक्त रविंद्र वायडा यांनी सहकारी संस्थांना पत्रव्यवहार केले आहेत. परंतु एकही सांगाडा हलविण्यात आलेला नाही. त्यामुळे लिलावगृहचे काम ठप्प आहे. यासंदर्भात सातपाटीमधील दोन्ही सहकारी संस्थाच्या मॅनेजरशी संपर्क साधला असता हे सांगाडे हटविण्यासाठी नौकाधारकाना नोटीसा बजावल्याचे सांगितले.
नौकांचे सांगाडे हटवा !
By admin | Updated: December 19, 2014 23:26 IST