Join us
Daily Top 2Weekly Top 5

बंधारे ठरताहेत वरदान

By admin | Updated: August 5, 2014 00:17 IST

कोकणात पाणीसाठा मुबलक आहे. मात्र पावसाळय़ात हे पाणी योग्यरीत्या अडवले जात नसल्यामुळे लाखो लीटर पाणी वाया जाते.

दासगांव : कोकणात पाणीसाठा मुबलक आहे. मात्र पावसाळय़ात हे पाणी योग्यरीत्या अडवले जात नसल्यामुळे लाखो लीटर पाणी वाया जाते. मात्र उन्हाळय़ात पाण्याची तीव्र टंचाई जाणवतच असते. अशावेळी कोकणातील गावांमध्ये छोटे छोटे बंधारे होणो गरजेचे असल्याचे नेहमीच बोलले जाते. जलसंधारणाची हीच कास धरत शासनाने पाणलोट विकास कार्यक्रम आखला आणि महाड तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण कोकणात आता पाणलोटच्या बंधा:यातून गावांचा आणि शेतक:यांचा विकास होवू लागला आहे. 
एकीकडे राज्यात दुष्काळ तर एकीकडे पाऊस अशी स्थिती गेली अनेक वर्षे सुरु आहे. कोकणात तर अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती आहे. याकाळात लाखो लीटर पाणी समुद्रास मिळून वाया जात असते. अशावेळी हे पाणी वाचवण्याच्या शिरपूर पॅटर्नने तर जलसंधारणाची एक वेगळीच दिशा राज्याला दिली. त्याचप्रमाणो हिवरेबाजारचे पोपटराव पवार यांनीदेखील पाणी अडवा पाणी जिरवा या माध्यमातून हिवरेबाजाराचे नाव राज्यात चमकवले. महाड तालुक्याला देखील असेच एक पोपटराव मिळाले ज्यांनी केवळ अधिकारीपद सांभाळले नाही तर तालुक्याच्या कोनाकोप:यात जावून पाणलोट संकल्पना यशस्वीपणो राबवली. 
पाणलोटबरोबरच तालुक्यात विविध कृषी योजना आणि नवनवे प्रयोग त्यांनी शेतक:यांना दिले आहेत. सरकारी अधिकारी म्हणून काम करताना चांगले काम करणा:यावर अधिक टीका होतात तसा अनुभव यांनादेखील आला असला तरी आपले काम याला अधिक महत्त्व देत त्यांनी पाणलोट विकासाची गंगा महाड तालुक्यात अधिक प्रभावीपणो राबवली आहे. 
डोंगरउतारावरुन वाहून जाणारे पाणी वाया जावू नये म्हणून ते पाणी तेथेच अडवून जिरवणो तसेच शेती आणि इतर कारणासाठी पाण्याचा वापर व्हावा याकरिता पाणी अडवून जिरवणो महत्त्वाचे आहे. याकरिता कृषी विभागाचे गतिमान पाणलोट बंधारे, सिमेंट बंधारे, माती बंधारे महत्त्वपूर्ण ठरत आहेत.
महाड तालुक्यात 2क्12 ते 2क्13 आणि 2क्13 ते 2क्14 मध्ये केंद्र पुरस्कृत एकात्मिक पाणलोट विकास या योजनेतून एकूण 48 सिमेंट बंधारे तर 18 सिमेंट वळण बंधारे बांधण्यात आले. त्याचप्रमाणो गतिमान पाणलोट विकास अंतर्गत राष्ट्रीय विकास योजनेतून 12 सिमेंट बंधारे, 7 वळण बंधारे बांधण्यात आले आहेत. ग्रामस्थांच्या मागणीचा विचार यामध्ये प्रामुख्याने केला गेल्याचे तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले यांनी सांगितले. 
महाड तालुक्यातील बहुतांश गावे दुर्गम भागात आहेत. यामुळे येथील पाणीटंचाई ही समस्या दिवसेंदिवस बिकट होत असतानाच पाणलोटचे बंधारे या समस्येवर उपायकारक ठरत आहेत. महाड तालुक्यात झालेल्या मातीबंधा:यांतून जवळपास 554 दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा उपलब्ध होत आहे. यामधून तालुक्यातील अनेक शेतक:यांनी भाजीपाला व इतर शेती करण्यास प्रारंभ केला आहे. हे पाणी साधारण मार्च ते एप्रिलर्पयत टिकणो अपेक्षित आहे. गावालगतच्या उपलब्ध पाण्याचे जे स्त्रोत आहेत त्यामधील पाण्याच्या पातळीत वाढ होणो ही एक महत्त्वाची बाब पाणलोटने साध्य केली आहे. तालुक्यातील फौजी आंबावडे, नांदगाव बुद्रुक, वीर, कुर्ले, साकडी, धामणो, जिते या गावांमध्ये हा प्रयोग यशस्वी झाल्याचे कृषी अधिकारी नवले यांचे म्हणणो आहे. 
पाणलोटच्या या बंधा:यामुळे तालुक्यातील 65क् हेक्टर भातशेती ओलिताखाली आली आहे. या कामांकरिता उपप्रादेशिक अधिकारी खैरनार यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृषी अधिकारी पी.बी. नवले, कृषी पर्यवेक्षक वसंत मोरे, शांताराम सणोर, एस.एस. केदार, कृषी सहाय्यक सतीश देशमुख, सतीश बाविस्कर, नवघरे, नेहते, विजय वानखेडे, किरण पोखरे, रुपाली ठोंबरे, माधव गोयनार यांनी मेहनत घेतली. (वार्ताहर)
 
डोंगरउतारावरुन वाहून जाणारे पाणी वाया जावू नये म्हणून ते पाणी तेथेच अडवून जिरवणो तसेच शेती आणि इतर कारणांसाठी पाण्याचा वापर व्हावा याकरिता पाणी अडवून जिरवणो महत्त्वाचे आहे. याकरिता कृषी विभागाचे गतिमान पाणलोट बंधारे, सिमेंट बंधारे, माती बंधारे महत्त्वपूर्ण ठरत आहेत. महाड तालुक्यात 2क्12 ते 2क्13 आणि 2क्13 ते 2क्14 मध्ये केंद्र पुरस्कृत एकात्मिक पाणलोट विकास या योजनेतून एकूण 48 सिमेंट बंधारे तर 18 सिमेंट वळण बंधारे बांधण्यात आले. त्याचप्रमाणो गतिमान पाणलोट विकास अंतर्गत राष्ट्रीय विकास योजनेतून 12 सिमेंट बंधारे, 7 वळण बंधारे बांधण्यात आले आहेत. ग्रामस्थांच्या मागणीचा विचार यामध्ये प्रामुख्याने केला गेल्याचे तालुका कृषी अधिकारी पोपटराव नवले यांनी सांगितले.