Join us  

मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशींची बदली, इक्बाल चहल नवे आयुक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2020 6:47 PM

प्रवीण परदेशी यांच्या जागी आता इक्बाल चहल हे मुंबई महापालिकेचे नवे आयुक्त असतील. 

ठळक मुद्दे प्रवीण परदेशी यांनी मे 2019 मध्ये मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला होता.

मुंबई : राज्यातील 'आयएएस' अधिकाऱ्यांच्या राज्य सरकारने शुक्रवारी बदल्या केल्या आहेत. यात मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांची बदली केली आहे. प्रवीण परदेशी यांची नगरविकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी बदली केली आहे. आता प्रवीण परदेशी यांच्या जागी  इक्बाल चहल हे मुंबई महापालिकेचे नवे आयुक्त असणार आहेत. 

प्रवीण परदेशी यांच्यासह मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांचीही बदली करण्यात आली आहे. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी ठाणे महापालिकेचे माजी आयुक्त संजीव जैस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आबासाहेब जऱ्हाड यांची आता मदत आणि पुनर्वसन सचिवपदी बदली करण्यात आली आहे. 

दरम्यान, प्रवीण परदेशी यांनी मे 2019 मध्ये मुंबई महापालिकेच्या आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला होता. याआधी ते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अतिरिक्त मुख्य सचिव म्हणून काम पाहात होते.  

टॅग्स :मुंबई महानगरपालिका